कविता
जर बहिणाबाई आज असती तर बहुदा अशीच कविता केली असती
( कवितेची चाल " अर संसार संसार .जसा तवा चुलीवर .." या कवितेसारखी )
-----------------------------------
स्वप्न करावी साकार .
आपुल्याच पोळीवर ओढी तूप फरफर
लाज नाही तीळभर ओढी तूप पोळीवर
मित्र आणि परिवार ...सारा पापाचा सागर . जनसेवा ढोंग सार...फुका करी चरचर
गरीबाचे हाल फार असा कसा कारभार
मेले जरी जन तरी ह्यांना काय खंत खार
यांचे सचिव लाचार..... मंत्र्यांचीच करी सर
सारे नोकर चुकार ......जिथे तिथे भ्रष्टाचार
नाही इन्दु.. जवाहर ...पोलादाचे सरदार
गुणी लाल बहादूर ..नाही आता दूरदूर
विकासाचा वाढे दर...गुण गातो चिदम्बर
महागाईला आला पूर..काय खोट काय खर
सोनियाचा पेले भार ..सरदार तो हुशार
केला देश अग्रेसर ...कीर्ती झाली जगभर
आता तुम्ही सोडा थेर...नका होऊ असे स्वैर
करा देशाचा विचार ...स्वप्न करावी साकार .
-------------- राजेन्द्र फणसळकर
१३ जाने. २०१३
Comments
Post a Comment