कृष्ण
कृष्ण म्हणजे... द्रौपदीची संपुर्णता,
राधेचि अपुर्णता
कृष्ण म्हणजे... कुंतिचा विश्वास,
सव्यसाचीचा श्वास
कृष्ण म्हणजे... कंस-कालियाचा संहार,
गोवर्धन पेलणारा तारणहार
कृष्ण म्हणजे... युधिष्ठिराचा धर्म,
जरासंध जयद्रथाचे कर्म
कृष्ण म्हणजे... कर्णाचा प्रयास,
दुर्योधनाचा निव्वळ कयास
कृष्ण म्हणजे... अभिमन्यूच्या पराक्रमाची गाथा,
अश्वथाम्याच्या जखमेची दंतकथा
कृष्ण म्हणजे... मिरेची भक्ति, सुदामाची शक्ति
कृष्ण म्हणजे... यमुनेचं वादळ,
गोकुळातला सावळा गोंधळ
कृष्ण म्हणजे... देवकिचे अस्त्र शस्त्र
यशोदेचे अत्र-तत्र-सर्वत्र
कृष्ण म्हणजे... ओठावर बासरी,
रणभुमित चक्रधारी
कृष्ण म्हणजे... काळाचा पटलावरचा किस्सा,
अवघं ब्रम्हाण्ड ज्याचा हिस्सा
कृष्ण म्हणजे... जंगलामधे एक एकटि चिता,
मनामध्ये तरंगणारी गीता
Comments
Post a Comment